Tuesday, 29 September 2015

प्रवास कला साधनेचा - 5

मला माझं "ब्रम्हस्वरूप" शोधायचंय.... 
पण कसं...?
मी जसजशी "थियेटर ऑफ़ रेलेवंस" मधे परफॉर्म करत गेले तसतशी 'ब्रम्हस्वरूप शोधाच्या' आणि 'सात्विकतेच्या' जवळ जात गेले. 
ढोबळ आयाम.... सारेच पाहतात. 
कलात्मक सात्वीकतेसाठी वेगवेगळे पैलू शोधून काढणं महत्वाचं. 
उदा. 
रुपया चे दोन पैलू असतात. 
मागची बाजु आणि पुढची बाजु - हा ढोबळ आयाम.
त्यासोबत रुपयाचे वर, खाली, आतला सर्कल... हे आणखिन आयाम पाहणं, हा थियेटर ऑफ रेलेवन्स चा उद्देश. 
इथे अर्जित केलेलं ज्ञान आपले मित्र, परिवार, सोबती यांसोबत वाटणं, शेअर करणं, आणि रोजच्या जीवनात ते ज्ञान अंगीकारणं ही अटच आहे. 
मुळात ती एक गरज आहे "कलात्मक लिबरेशनची" असं माझं ठाम मत आहे.
ध्वनी एक आहे तर त्याच्या प्रतिध्वनि किती असतील?
आकरविहीन आणि रूपविहीन प्रस्तुति असेल, तर ती कशी असेल? 
"Unheard Sounds of universe" नाटकाचा विचार, शोध, सृजनात्मक प्रकिया सुरु कधी आणि कशी झाली कळलं ही नाही.
मंजुल सर, नेहमी त्यांच्या दोन छोट्या छोट्या मुलींचं, एकमेकिंशी वीना संवाद, कृतीतून बोलणं सांगायचे, तेव्हा हाच आहे unheard असं वाटायचं.
Vibrations जेव्हा जाणवतात ते असावं Unheard. निसर्गाने साथ देणं, कुत्र्याने बरोब्बर आमच्या मागे मागे येणं किंवा पक्ष्यांचा संवाद असो .... न ऐकु आलेला परन्तु अस्तित्वात असणारा तो संवाद ऐकण्याचा प्रयत्न, रातकिड्यांच्या किरकिरीत म्युझिक शोधणं असो वा काजव्यांवर कविता करणं असो, 
चंद्र, चांदण्यांशी झालेला संवाद, तेव्हा आकाशात तयार झालेल्या चांदण्यांच्या विविध आकृत्या, शेतात झोपुन पाहणं, आकाशाचा, वाऱ्याच्या झुळकेचा, ताऱ्यांचा, त्या चंद्राचा Unheard ऐकणं.... ही सगळी एका नाटकाची प्रक्रिया आहे यावर तुमचा विश्वास बसेल....? 
सुरवातीला माझाही विश्वासच बसेना.
आपण आपला आवाज किती वेळा ऐकतो? 
आपला आपल्याशी झालेला संवाद....?
आत्मसंवाद, आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण, हाच Unheard नाटकाचा गाभा. 
"मी एक उत्तम कलाकार आहे" हाच आवाज आतून ऐकणं. त्यासाठी बाहेर डोकवण्यापेक्षा आपल्या आत डोकावणं. ही प्रक्रिया.
अश्विनी नांदेड़कर हिने, वज्रेश्वरीला एक पेंटिंग पाहिलं होतं... त्याविषयी ती सांगत होती की, एक बाई एका हातात ज्योती घेऊन उभी आहे. दुसऱ्या हाता मागे ती ज्योत लपलेली आहे. ती ज्योत आपल्याला दिसत नाही मात्र त्या ज्योतिचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला आहे. 
तो प्रकाश बाहेरील ज्योतिचा नसून तिच्या आंतिल ज्योतिचा आहे. 
हे सांकेतिक पेंटिंग मला 'माझ्या अनहर्डच्या' अधिक जवळ घेऊन गेलं.
As a Performer, मी माझी मूळं घट्ट करणं आवश्यक होतं. त्यासाठी आधी मी कोण आहे, आधी काय कामं केली आहेत, मी किती प्रसिद्ध आहे, हे सर्व सोडून, माझ्यातील व्यक्ति वर प्रक्रिया होणं सुरु झालं. याकरिता सतत स्वताःला तोड़त होते आणि पुन्हा उभी राहत होते.
मी अभिनेत्री आहे का? 
माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे का? इथपासून ते.... मी काय विचार करते? माझ्यात माणुसकी आहे का? इथपर्यंत स्वतःचा शोध घेतला, 
या शोधात कित्येकदा पडले, धड़पडले, तड़फडले, स्वताःला सावरलं, नियोजन केलं. आणि शिकले,
"कोणताही एक्टर असो, तो सेलिब्रिटी लोकांसाठी असतो स्वतःसाठी नाही." ही प्रकिया एक सेलेब्रेटी ते एक सात्विक कलाकार, ते एक सात्विक व्यक्ति अशी होत गेली.
सरांसोबत खुप चर्चा झाल्या, वाद विवाद झाले, प्रशोत्तरे झाली.... 
सर नेहमी म्हणायचे, "बहुत मुश्किल होता है अपने अंदर होने वाले अनजाने प्रभाव को हटाना।" आधीच्या धुक्यातून बाहेर येऊन स्वच्छ नितळ आभाळ आम्ही मंजुल भारद्वाज सरांसोबत पाहिलं.
माझे कंडिशन्ड विचार हळूहळू मेणाप्रमाणे वितळत गेले आणि त्यांची जागा कायमस्वरूपी ठोस विचारांनी घेतली. माझा पाया पक्का होत होता.
आत्मपरिक्षणात आम्ही आमचे "यशस्वी असण्याचे अर्थ","यशस्वी असण्याचे मापदंड" शोधून काढले, असफल असण्याचे मायने समजून घेतले. आणि जे प्रत्येक कलाकाराने शोधणं आवश्यक आहे.
या आत्मसंवाद प्रक्रियेत कलाकाराने "स्वतःशी सतत सातत्य ठेवणं" अतिशय आवश्यक आहे.
कलाकार जेव्हा स्वतःच्या अधिक जवळ जातो, आपला आवाज ऐकतो, म्हणजेच आपले Impulse फॉलो करतो तेव्हा तो आपल्या आंतिल आणि बाहेरील निसर्गाच्या अधिक जवळ जातो आणि तेव्हाच तो खरा भासतो. प्यूअर असतो. सात्विक असतो.
या चमचमत्या दुनियेत अनेक कलाकार खोटा मुखवटा घेऊन वावरताना दिसतात. "थिएटर ऑफ़ रेलेवन्स" च्या प्रक्रियेत तुमच्या मुखवटयाला बाहेर काढून आंतिल चेहरा समोर येतो जो सहाजिकच प्यूअर, नैचरल असतो. 
तो कलाकार एक माणुस म्हणून स्वताःला भेटतो...
आणि म्हणूनच.....
Unheard sounds of universe हे नाटक कलाकाराला उन्मुक्त करतं. 
तो कोण आहे? 
कलाकार म्हणून जगण्याचा काय उद्देश आहे? 
आणि त्याची ताकद काय आहे याची जाणीव करून देतं.
आणि जेव्हा ही जाणीव होते तेव्हा तो त्याचे स्थान मजबूत करून सुंदर विश्वनिर्मिती करण्यासाठी प्रेरीत आणि प्रतिबद्ध होतो.






क्रमशः

Thursday, 24 September 2015

प्रवास कला साधनेचा - 4

अशाच एका चैतन्य अभ्यासात असताना शोध लागला Unheard Sounds चा... उन्हाळ्याचे दिवस होते, आज सकाळीच आम्ही शांतिवनातील अजुन एक नवीन जागा शोधून काढली. चहु बाजूंनी झाडे आणि मधे शेतीची भेगाळलेली जमीन होती. आम्ही त्या भेगाळलेल्या जमिनीवर झोपुन हमिंग करत होतो. त्या शांत वातावरणात आमच्या हमिंग चा सूर घूमत होता. आणि अचानक पक्ष्यांना कळलं की, इथे काही नविन आहे. आणि त्यांनी एकमेकांशी संवाद साधायला सुरवात केली. आमचा सूर आणि त्या पक्ष्यांचा संवाद यांचा एक सुरेख नाद तयार झाला होता. हा नाद ऐकताच सरांच्या तोंडून उद्गार निघाला, "साउंड्स ऑफ़ यूनिवर्स" ......
त्या एका उद्गाराचं पुढे नाटकात रूपांतर होईल, याची कुणी कधी कल्पनाही केली नव्हती आणि सरांच्या डोक्यात या हुंकारापासूनच नाटकाची प्रक्रिया सुरू ही झाली होती.
चैतन्य अभ्यास प्रक्रियेतून आल्यावर सरांनी "रंगकर्मी" हे नाटक परफॉर्म करायला सांगितलं. पुन्हा संघर्ष सुरु. कारण आत्तापर्यंत एका मागोमाग एक अशा संवादांचं नाटक असतं हेच पाहिलं होतं आणि "रंगकर्मी" हे नाटक सलग एका लेखाप्रमाणे दिसंत होतं... पुन्हा गर्भित अर्थांनी, विचारांनी भरलेलं क्लिष्ट हिंदी नाटक..... "अरे हा लेख म्हणजे काय नाटक आहे का? आणि लेख कसा परफॉर्म करणार?" काही सुचत नव्हतं. सर एक-एक टास्क कुठून शोधून आणतात याचं नवल वाटत होतं.
मात्र यावेळेस पुन्हा प्रक्रिया भिन्न होती. 4 तास संघर्ष झाल्यानंतर सरांनी पहिलंच वाक्य वाचायला सांगितलं, 
"मैं कौन हूँ? क्या हूँ? इसकी मुझे अब चिंता नहीं है।" असं लेखक का म्हणंत असावा? याचे अनेक अर्थ शोधून काढले. पण मूळ अर्थ माझ्या आत दडलेलाय, (प्रत्येक परफ़ॉर्मर च्या आत दडलेलाय) हे सरांनी एका सुंदर प्रोसेसने दाखवुन दिले.
सरांनी आधी, "मैं कौन हूँ?" हे लिहायला सांगितलं. 
एक व्यक्ति, लड़की, मुलगी, बहिण, बायको, सून आणि कलाकार. 
मैं क्या हूँ?, अभिनेत्री, गृहिणी, लेखिका, नर्तिका.
अब इन सबकी मुझे कोई चिंता नही असं म्हणायचंय.....
आता कनव्हिक्शन कसं येईल....? या विचारांत सरांनी दिवसभर आम्हाला तसंच सोडून दिलं आणि आम्ही कनव्हीक्शनच्या शोधात.....
संध्याकाळी चैतन्य अभ्यासाची वेळ आली तेव्हा सरांनी आम्हाला एका टेकडीच्या उताराशी नेलं. निसर्गरम्य परिसर होता तो... चहुबाजूंनी झाडे, फुलझाडे, टेकडीच्या बाजूने नदीचा वाहता खळखळता प्रवाह आणि टेकडीच्या तोंडाशीच एक संथ पाण्याचा कुंड तयार झाला होता. आम्हा सर्वांना कनव्हीक्शन हवं म्हणून सरांनी त्या टेकडीच्या उतारावरुन चालायला, धावायला सांगितलं. यात कसं कनव्हिक्शन मिळणार? माझा धीर सूटत चालला होता.
धावता धावता रंगकर्मी नाटकाचे संवाद म्हणू लागलो. तिकडच्या पाना-फुलांना सांगू लागलो, मैं कौन हूँ? क्या हूँ? इसकी चिंता नही। पण म्हणजे नेमकं काय? इतक्यात सरांनी आवाज दिला...सर्वांना टेकडीच्या टोकावर उभं राहायला सांगून तिथून उताराकडे पाहायला सांगितलं आणि काय दिसतंय विचारलं....
त्या उतारावर चार पायऱ्या तयार झालेल्या दिसल्या. सर म्हणाले, त्या चार पायऱ्या म्हणजे आयुष्याचे चार टप्पे आहेत. बाल्यावस्था, कौमार्यावस्था, तारूण्यावस्था आणि वार्धक्यावस्था आणि उतार संपल्यावर पुढे जे संथ पाण्याचं कुंड दिसतंय ते मोक्षाचं कुंड आणि आता या उतारावरुन चालत जा आणि त्या मोक्षाच्या कुंडापर्यंत पोहचुन पुन्हा वर चालत या आणि आता म्हणा, मैं कौन हूँ? क्या हूँ? इसकी मुझे अब चिंता नही है।
अंगात चैतन्य संचारावं तसं झालं... मी डोळे बंद करून त्या मार्गावर चालू लागले. पहिल्या पायरीवर उतरले माझी बाल्यावस्था आठवली. त्या अवस्थेतून कौमार्यावस्था आणि त्यातून तारुण्यावस्थेत रूपांतरित होतानाची प्रक्रिया अनुभवली आणि वार्धक्यावस्थेत असल्याची कल्पना करत मोक्षाच्या तोंडाशी पोहचले.
जब विचार आपके पकड मेँ हो तभी कनव्हीक्शन आता है।
आता डोळ्यांत चमक आली होती आता ती जागा अधिक प्रफुल्लित आणि सुंदर भासू लागली.
आत्तापर्यंत लेखकाने लिहिलेले संवाद अभिनेत्याने पाठ करून सादर करणं हे आणि इतकंच अनुभवंत होते. मात्र "रंगकर्मी" नाटकाची स्क्रिप्ट किंवा "मैं औरत हूँ" नाटकाची स्क्रिप्ट हातात आल्यावर "आत्मसंवाद" हे देखिल एक नाटक असतं याची जाणीव होते. केवळ संवादांच्या नाटकातून मी आत्मसंवादांच्या राज्यात फेरफटका मारुन येत होते. मंजुल सरांच्या नाटकातिल सक्षम विचारांतून आपली नाट्यसमज विकसित होते, समृद्ध होते. म्हणूनच मी ठामपणे सांगू शकते की, या नाट्य प्रवासात मी एक अभिनेत्री म्हणून माझेच माइंडसेट्स तोडतेय आणि अधिकाधिक नवनवीन विचारांनी समृद्ध होतेय.
आता तो रंगमंच 'जिवंत' दिसत होता आणि आता त्या मार्गावरून आपल्या अस्तित्वाचा शोध घेत चालताना मला माझी 'चाल' आणि 'विचार' सुसंगत वाटु लागले होते. पुन्हा परतीला निघताना, त्या मोक्षाच्या कुंडात, माझ्या आधीच्या कामाचा हलकासा प्रकाश पडलेला होता, तो प्रकाश शांतपणे त्या पाण्यावर तरंगत होता....
आणि मी मात्र सगळं मागे टाकून पुनरुज्जीवित होण्याच्या दिशेने धावत होते, वर-वर प्रगतिच्या दिशेने. मागची मोहमाया मागेच टाकून..... खऱ्या अर्थाने रंगकर्मी होण्याची ही वाटचाल... ज्ञाताकडून अज्ञाताकडे..... मोक्षापासून पुर्ननवजीवनाकडे......

क्रमशः

Sunday, 20 September 2015

प्रवास कला साधनेचा -3

Theatre of Relevance च्या वर्कशॉप मधे "चैतन्याभ्यास" ही प्रक्रिया मला फार आवडते आणि फार महत्वाची वाटते.
"तुझ्या होण्याची, असण्याची चेतना देणारा अभ्यास म्हणजे चैतन्याभ्यास."
प्रत्येक चैतन्याभ्यास हां नावाप्रमाणे जगण्याचं चैतन्य, निसर्गाकडे पाहण्याची, त्याच्याकडून शिकण्याची एक निराळी दृष्टी देऊन जातो आणि एकदा का ही दृष्टी निर्माण झाली, की निसर्ग ही जिवंत होऊन तुमच्याशी बोलू लागतो आणि कलाकार म्हणून जगताना कलात्मक वीणा झंकारू लागतात.वाऱ्याचा स्पर्श, सूर्याचा उगम, दवबिंदूंचे मोती यांना पाहून कलात्मक चेतनेची नवी परिमाणे उभारु लागतात.
मला आठवतंय, माझ्या पहिल्याच वर्कशॉप मधील एक चैतन्याभ्यास. सकाळी 6 वाजता चैतन्य अभ्यासाला निघालो. उगवणारा सूर्य, त्याचा उगवताना तो मंद प्रकाश, बहुरंगी आकाश आणि त्यातील प्रसन्नता अनुभवली आणि मग सरांनी प्रत्येकाला विचारलं, आज काय काय करणार? आज मी अक्खा दिवस पॉसिटिव्हली जगणार!! ही ऊर्जा घेउनच पुढे चालायला लागलो.
आम्ही शेताच्या भेगाळलेल्या जमिनिवरून चालायला लागलो. चालताना मोठे मोठे दगड... पुन्हा सपाट रस्ता, कधी उतार तर कधी चढ़ लागत होते. चालताना सर म्हणाले, याच खाचखळग्यातुंन, चढ़ उतरावरुन आयुष्यातही पुढे जायचय...एक मोठ्ठा चढ़ चढ़लो आणि मग पुढे रस्ता लागला. सपाट डाम्बरी रस्ता. सर म्हणे, जर ती चढ़ चढलो नसतो तर हां सपाट डांबरी रस्ता दिसला नसता.
सूर्य कितना भी बड़ा ताकदवर हो रात को नही टिकता, थोड़े चढ़ाव उतार तो आएंगे....face it!!
सरांनी त्या रस्त्यावर मला उभं राहायला सांगून, मला तो रस्ता पाहायला सांगितला... माझं आयुष्य धावत होतं त्या मार्गावरुन. मला "भाग मिल्खा भाग" मधिल तो धावता रस्ता आठवतोय...? त्याचं vision फिक्स होतं ते त्याला दिसत होतं मला या मार्गावरुन धावायचंय. आपल्याला आपलं vision फिक्स करून लक्ष्य गाठायचंय हां संकेत होता.
मी पाहिलं, या वर्कशॉप मधे 4 ही दिवस एक छोटी कुत्री सतत आमच्या सोबत असायची. तीला खरंतर आम्ही कुणी कधी खायला ही दिलं नाही तरी सोबत असायची आणि चैतन्याभ्यासाला निघालो की ती बरोब्बर केवळ सरांना फॉलो करायची. बसलो की बसायची, झोपलो की ती ही झोपायची..... हां खेळ केवळ positive vibrations चाच होता.
पुढे चालत एका रानात शिरलो... रानातील विविध वनस्पति, त्याचे वेगवेगळे आकार, त्या झाड़ा झुडपांचा स्पर्श, एकाच रंगाच्या विविध शेड्स बघत, त्या रानटी फुलांचा सुगंध घेत पुढे जात होतो. इतक्यात एक विहीर दिसली. आम्ही आत डोकाउन पाहिलं. पाण्याचा साठा दिसला. या विहरित पाण्याचा साठा आहे म्हणून नळाला पाणी येतय.. विहरित पाणी साठवलेलच नसेल तर.... त्याचप्रमाणे कलाकार म्हणून जगताना तुमच्याकडे अनुभवांचं भांडारच नसेल, तो अनुभवांचा साठा जतन केलेलाच नसेल तर तुम्ही व्यक्त काय होणार, कुठल्या शिदोरिवर काम करणार? कलात्मक साधनेसाठी दृष्टि असणं आवश्यक आहे. म्हणून रोज डायरी लिहिल्याने त्यातील अनुभवांचा साठा तुम्हाला पुढे मदत करतो. आणि चैतन्याभ्यासातील प्रत्येक अनुभव हा त्या अनुभवांच्या विहरित रोज थेंब थेंब पाणी साठवत राहतो.
पुढे काटेरी कुंपणाने रस्ता बंद केलेला दिसला. मागे फिरलो आणि दुसऱ्याच रस्त्याने आम्ही परत आलो तेव्हा हे शिकलो की एक रस्ता बंद झाला तरी दुसरा असतो फ़क्त तो शोध आपण घ्यायचा, मार्ग सापड़तो.
चालत चालत एका बांबूच्या झोपडित येऊन बसलो. सरांनी प्रत्येकाला विचारलं, हे नाव ऐकून तुमच्या डोक्यात काय इमेज येते सांगा. उदा. शिवाजी मंदिर- व्यावसायिक नाटक, मदर टेरेसा - अनाथान्ना आश्रय, भगतसिंग- देशासाठी समर्पण. तेव्हा सर म्हणाले, तुम्ही किती समर्पित आहात तुमच्या कलेसाठी? आपलं नाव घेताच आपलं समर्पण आठवायला हवं.
स्थायित्व बनवता, टिकवता यायला हवं. award च्या मागे न लागता, स्वताःला त्याच चौकटित न घालता, स्वताःला हवं ते करूनही मोठं होता येतं. passion हवं. आपल्या व्यक्तिमत्वाला स्थायित्वाची जोड़ देता आली तर as an actor तुम्हि पुढे जाऊ शकता. मग सरांनी मला विचारलं की, एक ऐसा आदमी बताओ जो तुम्हारी नझर में achiever है। मी म्हणाले, अब्दुल कलाम. सर म्हणाले, त्यांचं aim फिक्स होतं, अग्निमिसाइल बनवण्याचं, त्यांनी त्यांचं काम केलं, एवॉर्ड ची पर्वा केली नाही आणि सकाळी सकाळी तू नवऱ्याचं नाव न घेता त्यांचं नाव घेतलंस हे मिळालं त्यांना award. ते स्फूर्ति बनले न माझी... तू कधी होणार कुणाचितरि कलात्मक स्फूर्ति.... या वाक्यांनी एक संवेदनशील, कलात्मक, वैचारिक अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करण्याचं स्फुरण मिळत होतं
एका कलाकाराला दृष्टी असणं महत्वाचं आणि सोबत alertness. रस्ता माहित असणं किंवा रस्ता तयार करणं महत्वाचं. जसं, आज या जंगलात येताना आम्ही नवीन रस्त्याने आलो. हा नाविन्याचा शोध घ्यायला या निर्जन रानात आम्ही आलो म्हणूनच तर मार्ग सापडला.....
आणि इथे मला कळकळीने नमूद करायचंय की,
आज माझी मराठी रंगभूमी बरीच समृद्ध झालेली दिसते. वेगळ्या धाटणीची, वेगळ्या वाटेवरचि नाटके अनुभवायला मिळतात. मात्र अजूनही काही अंशी आपण तथाकथित रंगभूमी, बॉक्स सेट, "कॉमेडिच नाटके चालतात", "मराठी रंगभूमिवर असं चालत नाही बाबा..." यात अड़कलेले दिसतो. यांतून कधी बाहेर येणार? माझ्यासारखे अनेक कलाकार सफोकेट होत आहेत. त्यांना ही नाविन्या ची ओढ़ आहे. पण एकतर त्यांनाच याची जाणीव नाही किंवा जे मिळतंय त्यात ते समाधान मानत आहेत. 
अजूनही बऱ्याच ठिकाणी "कलात्मक सत्वासाठी" तळमळ दिसत नाही. केवळ पैसा कमावणे आणि कलाकार ऐवजी कलामजुर होऊन पोट भरणे हेच ध्येय दिसते. आणि 
"लोकांना हेच आवडतं..." हाच excuse अजुन किती दिवस देणार? ही बहाणेबाजी का? 
मोठ्या संख्येने नाट्यवेडे लोकं असून, मराठी प्रेक्षकांचा इतका मोठ्या प्रमाणात पाठिंबा असून सुद्धा कलाकारांची कलासाधना किती प्रमाणात होते....?
जरा पुढे चालत गेलो, तेव्हा अजुन एक झोपडी दिसली... आधी फक्त ती मगासचीच बांबूची झोपडी दिसत होती पण जसं आपण पुढे चालत आलो तशी ही नवीन झोपडी दिसू लागली. याचाच अर्थ, काही आहे, जे आपल्यासाठी आहे, ते आपली वाट पाहतंय... गरज आहे मार्गातून पुढे जाउन ते शोधण्याची... गरज आहे डोळे उघडे ठेऊन पाहण्याची...
सूर्याची कोवळी किरणे पाठीवर घेत आम्ही त्या इवल्याश्या झोपड़ित स्वताःला उसवत होतो...उसवण्यावरुन आठवलं, आपल्या गाठीचा एक जरी धागा उसवला नं, की improvement सुरु होते.
मुळात एका सात्विक कलाकाराचा उगम होण्याकरिता आधी त्या व्यक्तिचा, त्या व्यक्तिमत्वाचा उगम होणं आवश्यक आहे. त्या व्यक्तिमत्वात कलात्मक ऊर्जा, कलात्मक दृष्टी तेव्हाच प्राप्त होते जेव्हा तो निसर्गाच्या अधिक जवळ जातो.
म्हणूनच हां चैतन्याभ्यास मला कलाकार म्हणून माझ्यातील निसर्गाच्या अधिक जवळ नेणारा भासतो!!


क्रमश:

Wednesday, 16 September 2015

प्रवास कला साधनेचा- 2

माझा निर्णय झाला वर्कशॉप attend करायचा. अश्विनीला कळवलं मी येतेय... तेव्हा तिने सांगितलं, तुझा अजेंडा पाठव. अजेंडा म्हणजे कार्यावली. तुला तुझ्यात काय बदल घडून येण्याची अपेक्षा आहे, तू वर्कशॉपला का येते आहेस हे थोडक्यात लिही.

"मला योगिनीला भेटायचंय" असं सहज मी बोलून गेले....पण त्या सहज बोललेल्यावर इतक्या गम्भीररित्या काम होईल याची कल्पनाच केली नव्हती.

दिनांक 12 एप्रिल 2014.
मी 5 दिवसीय residential वर्कशॉप साठी सकाळी पनवेल जवळील "शांतीवन" येथे पोहचले. मला जरा पोहचायला उशिरच झाला होता. मंजुल भारद्वाज सर आणि अश्विनी पुढे निघुन गेले होते, मला pick up करायला सायली पावसकर थांबली होती. रिक्शा शांतिवनाच्या कैंटीन जवळ उभी केली समोर मंजुल भारद्वाज सर आणि अश्विनी नाश्ता करत बसलेले दिसले. इतक्यात रिक्शावाल्याने ओळखलं, तुम्ही सीरियल मधे काम करता नं...इकडं शूटिंग आहे का? आता त्याला काय सांगू, मी इथं मलाच "शूट" करायला आलेय....

मला उशीर झाला होता...धावत जाऊन सरांना भेटले, हेल्लो सर, "हुम्म... 20 मिनिट्स लेट हो।, सगळ्यात आधी तर तू क्लिअर हो, की हां तुझ्या शूटिंगचा सेट नाही आणि इथे तुला कुणी शॉट रेडि असं सांगायलाही येणार नाही. So be prepared and be alert." बापरे!! आल्या आल्या माझं असं "जंगी स्वागत" झालं.
विषय बदलावा म्हणून मी म्हंटलं, आपल्या मुंबईत इतकी शांत आणि हिरविगार जागा आहे हे माहितच नव्हतं... "अगं ती जागा तुझ्यातही आहे हे तरी तुला माहीत होतं का...." बापरे... पुन्हा एकदा मंजुळवाणी झाली.
मग म्हंटलं जाउदे, आपण खाऊन घ्यावं म्हणून नाश्टयाच्या प्लेट ची वाट बघत बसले तर पुन्हा मंजुळ आवाज आला, "इथे तुला कोणी काही आणून देणार नाही help yourself.." उठले... डिश घेतली... चुपचाप नाश्ता करायला बसले. मला कळेचना, हां माणूस मी आल्यापासून माझ्याशी असं का बोलतोय...
आजुबाजुला पाहिलं तर सर आशु(अश्विनी नांदेडकर),सायली आणि अली असे 4 जण सोडले तर माझ्याव्यतिरिक्त तिथे नवीन असं कुणीच दिसत नव्हतं. आता वर्कशॉप म्हंटलं की साधारण 25-30 जणांचा ग्रुप असेल असं काहिसं मी imagine केलं होतं... इथे मोजून 5 जण बघुन मी हळूच आशुला विचारलं, "आपण एवढेच...? बाकी कुठेयेत...?"
"तू इथे स्वतःसाठी आलीएस की इतरांसाठी...? लोकांना शोधायचंय की तुला... हे ठरंव आधी..."  पुन्हा मंजुळ बॉम्ब!! झालं... मी बोल्ले की दणादण वार होत होते...
इथे आल्याच्या 5 व्या मिनिटाला मी रडत होते. सरांनीही मला रडू दिलं... माझं अवसानच गळून पड़त होतं जणु त्या अश्रुतूंन... हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की आपलं पोस्टमॉर्टम होतंय. सरांनी माझ्या बोलण्यात येणारा नकारात्मक भाव, पण, पाहिजे, बघेन, करेन, हे शब्द टॉन्ट करायला सुरवात केली आणि माझं लक्ष सतत त्या शब्दांकडे वळवण्यात आलं.  "मी हे केलं पाहिजे" ऐवजी "मी हे करायला हवं." किंवा "नाटक चालू होतं" ऐवजी "नाटक सुरु होतं", "नाटक बसवलं" पेक्षा " नाटक उभं केलं" या शब्दांचा वापर अधिक सकारात्मकता देतो....
माझ्या लक्षात आलं की माझ्या बोलण्यात सतत नकार येतोय आणि त्यावर काम सुरु झालंय.

मग सुरु झाला तास. शांतिवनाच्या त्या जंगलात आम्ही एकत्र बसलो. आजबाजुला झाडे झुडुपे, पक्षांचा मधुर किलकिलाट, मोकळी जागा, मोकळी हवा अशा मोकळ्या वातावरणात हळूहळू स्वताःला उलगडु लागलो...

इतक्यात, सरांनी लिहिलेल्या "मैं औरत हूँ" नाटकाचं स्क्रिप्ट माझ्या हतावर टेकवत सरांनी विचारलं, "हे किती वेळात परफॉर्म करशील" पुन्हा एक बॉम्ब!! बरं आधी वाच... ते क्लिष्ट हिंदी वाचून सुरवतीला तर मला काहीही कळलं नाही आणि आता ते परफॉर्म करणं... मला टेंशनच आलं. "नाही सर मला नाही जमणार" हां घोष सुरुच होता. समजून घ्यायचा प्रयत्न केला, तरी ते समजत नव्हतं. आता तर हे लिहितानाहि हसू येतय....
इथे मला नमूद करावंसं वाटतं की, आपल्याला केवळ मराठी भाषेतून कामं करत असताना हिंदी किंवा इतर भाषांचं केवळं बर्डन वाढतं म्हणून इतर भाषिक कामं नाकारणारे कलाकार आहेत. पण मग वैश्विक अनुभव कसा होणार? कलाकार म्हणून आपण समृद्ध कसे होणार...आपण स्वतःवर काम करायला टाळाटाळ का करतो?
सरांना यांतून मी सेल्फ डिपेंडेंट होणं अपेक्षित होतं.

दिग्दर्शक सांगेल तो आणि तोच अर्थ अंतिम असं आपण ऐक्टर्स मानून चालतो. इथे आल्यावर, या स्क्रिप्ट चा तुला जो आणि जसा अर्थ लावायचा तो लाव आणि परफॉर्म कर ही मोकळीक होती, संधी होती. पण तेव्हा ती समजली नाही. सरांनी मला त्या विचित्र स्क्रिप्ट सोबत एकटीलाच सोडून दिलं... असं वाटत होतं आणि माझा तिच्याशी काही ताळमेळच जुळत नव्हता.

खुप झगडून पाठांतरास सुरवात केली तर पुढचं पाठ मागचं सरसपाट होई कारण त्या शब्दांमागचा गर्भितार्थ समजत नव्हता आणि तो समजाउन संगण्याची गरज भासत होती.  अश्विनीने हिंट दिली की नुसतं बसून वाचु नको फ्लोअरवर उतर...परफॉर्म करता करताच शिकशील आणि वाक्यहि लक्षात राहतील. चहां प्यायला भेटलो तेव्हा सरांना डोकं धरून सांगितलं... सर वाट लागलिये.... नाही होतेय....

तेव्हा सरांनी इतकं सुंदर समजावलं की, जेव्हा कुठलीही स्क्रिप्ट तुमच्याकडे येते तेव्हा तुम्हाला excitement होते की burden येतं... विचार कर... excitement असेल तर मेहनत कर आणि तिची दिशा ठरंव आणि burden येत असेल तर... तुम शो ऑफ़ कर रहे हो, तुम्हे सिर्फ दिखावे मेँ interest है, मेहनत नही करनी। खोज नही रही हो तुम... मला अक्षरशः थोबाडित मारल्यासारखं झालं. खरंच मी शो ऑफ़ लाच महत्व देत होते....मला आवडतं कुणी माझं कौतुक केलेलं... आम्ही तुम्हाला सीरियल मधे पाहतो, छान काम करता...असं ऐकायला आवडतं. पण म्हणजे लोकं ठरवणार का, मी चांगली अभिनेत्री आहे? आणि लोकं बोलली म्हणून मी चांगली अभिनेत्री होते का? चांगली अभिनेत्री होण्याचे मापदंड काय? मला अजुन purity कड़े जायचंय. एक संवेदनशील अभिनेत्री व्हायचंय... किती दिवस खोटी जगु? सुप्तावस्थेत एक जाणीव होती की, मी वागतेयं ते खोटय. त्यात प्यूरिटी नाही. कळंत असूनही वळंत नव्हतं, सरांच्या बोलण्याने डोळे खाड़कन उघडले.

जब आपको कोई रोल मिलता है प्रिपेअर होने के लिए तब आप क्या करते हो...?
* स्क्रिप्ट वाचणे,
* अर्थ समजून घेणे,
* मुद्दे लक्षात घेणे,
* फील करणे,
* स्वताःला Emote करणे, व्यक्त करणे
* Perform करणे.
या पायऱ्यांमधे मी कुठेय? पुस्तकी वाटतात हे पॉइंट्स. मीच लिहिलेल्या वरील मुद्द्यांत मी पाचव्या पायरीवर आहे.
* आनंद कुठेय?
* मला स्क्रिप्ट मिळाली
* मला काम मिळालं
* मला चॅलेंज मिळालं याचा आनंद....
ऐक्टिंग करनेके लिये टेन्शन आता है तो आप ऐक्टर मत बनिए। Take it as a challenge, be happy and move ahead. हे मी शिकले.
आप खुद ही जीवित नही हो तो ऐक्टर में कहाँ जान आएगी...और कैरेक्टर तो दूर की बात है।

मला मोकळं जगायचंय, मोकळं हसायचंय, जगणं शिकायचंय आणि म्हणून मी इकडे आहे.
"Theatre of relevance"

पुन्हा रडून मोकळी झाले आणि तड़क स्क्रिप्ट वर काम करायला लागले. सरांनी मला सगळ्यांच्या डोळ्यांत पाहायला सांगत सगळ्यांशी कनेक्ट व्हायला सांगून action ला reaction या तत्वानुसार सगळ्यांना कनेक्ट, involve करून घे सांगितलं. तुम्ही exit घेतल्यानंतरहि लोकांनी तुम्ही परत कधी येता अशी वाट पाहायला हवी... तो actor or performer.
आणि
sales girl ती... जी नेहमी overhype असते. जीला सगळ्यांमधे मीच उठून दिसावं असं वाटतं.... काहि ऐक्टर्स नाटकातही हेच करतात. इथे केवळ "तो" किंवा "ती" दिसतो/दिसते. पण नाटक मरतं... तूम्ही ठरवायचं तुम्हाला नेमकं काय व्हायचं.

* त्यानंतर एक महत्वाची गोष्ट घडली जी इथे नमूद करायलाच हवी, संध्याकाळी आम्ही दूरवर शेतात फिरायला निघालो. मी केवळ सरांना follow करंत होते. सरांनी आम्हा चौघांना त्या भेगाळलेल्या जमिनीवर झोपायला सांगितले. मला त्या मातीवर झोपणं विचित्र वाटत होतं पण हां अनुभव वेगळा होता.
आम्ही सांगीतल्याप्रमाणे झोपलो आणि आकाशातील चंद्र पाहू लागलो. सरांनी त्या चंद्राशी गप्पा मारा असं सांगितलं. मी त्या नीरव शांततेत, त्या चंद्राच्या शीतलतेत न्हाउन निघत होते. तो थंड, मंद प्रकाश अंगावर घेत, त्याच्याकडे बघत, त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होते. त्याचा माझ्याकडे येणारा शीतल प्रकाश मला आशीर्वाद देतोय असं भासलं आणि माझ्या स्वर्गीय बाबांची आठवण आली. आज ते असते तर.... तुझी शीतलता आणि शांतता मला मिळू दे. मला न्हाउन निघायचंय, मोकळं व्हायचंय मला पदरात घे!!
मग डोळे मिटून चंद्राला डोळ्यांत सामाऊंन घेत हमिंग सुरु केलं. पुन्हा ती शांतता अनुभवली. मन शांत शांत होत होतं आणि आनंदी वाटू लागलं होतं.

सरांनी, काय वाटलं, असं विचारलं, तेव्हा चंद्राचा प्रकाश चेहऱ्यावर घेत, त्याच्याकडे बघत, मी काय बोल्ले मला ठाऊक नाही, पण मी पूर्णतः कनेक्ट झाले होते. माझ्या आजुबाजुचा परिसर, माणसे या सगळ्याचा विसर पडला होता आणि तिथे फक्त मी आणि चंद्र असे आम्ही दोघेच उरलो होतो. अत्तुच्च आनंद डोळ्यांतून घळघळ ओसांडत होता. मी खरंच न्हाऊन निघत होते. माझं "मी" पण गळून पडलं आणि मी कधी चंद्राशी एकरूप झाले मला कळलंही नाही. एका वेगळ्याच विश्वात गेल्याचा अनुभव होता तो....

मी आत्तापर्यंत केवळ शरीर संबंधातुनच आपण त्या परमोच्च आनंदा पर्यंत पोहचू शकतो असं ऐकलं होतं पण आज निसर्गाने मला जो परमोच्च आनंदाचा क्षण दिला तो शब्दात कसं मांडू....??

आज मी भरून पावलेय. घेतलिय एनर्जी निसर्गाकडून. प्यूअरिटी आणखिन काय असते.... आता ती टिकउन ठेवणं महत्वाचं, ते जमायला साधना हवी!!

सरांना मीठी मारुन हमसाहमशी रडले.... शांत झाले. समृद्ध झाले.




क्रमशः

Monday, 14 September 2015

प्रवास कला साधनेचा. 1.

नमस्कार मी योगिनी चौक.

एक अभिनेत्री,
"महाराष्ट्राचा सुपरस्टार" या ऍक्टिंग बेस्ड रिआलिटी शो ची विजेती.
अकादमी ऑफ़ थिएटर आर्ट्स, कलीना यूनिवर्सिटी, मुंबई मधून अभिनयाचं रितसर प्रशिक्षण घेतलेली.
रुईया महाविद्यालयात युथ फेस्टिवल, झोनल, नॅशनल लेवल कॉम्पिटिशन्स मधे विविध बक्शीसे पटकावली.
आत्तापर्यंत, 5 सिनेमे, 8 व्यावसायिक नाटके, 9-10 सीरियल्स असा अनुभव पाठीशी. 

सगळं आरामात चांगलं सुरु होतं. इथे मान-सन्मान होता, ऍवार्ड फंक्शन्सला बोलावणं होत होतं, तिथे परफॉर्म करत होते, दहिहंडी, दांडियाच्या सूपाऱ्या ही घेतल्या, खुप पैसे कमावले. फ्री पासेस मिळायचे, without ऑडिशन केवळ नाव ऐकून कामे ही मिळायची....
इतकं सगळं सुरळीत सुरु असताना, मी मात्र सतत स्वतःवर नाराज होते. मी जे काम करतेय तेच खरंतर मला हवंय का? की मी काही वेगळं करण्याच्या शोधात आहे? मी जे काम करतेय त्यात खरंच मला समाधान मिळतंय का? की केवळ शो बाजी होतेय? हे प्रश्न सतत मनात काहुर माजवत होते. पण मी त्यांकडेही दुर्लक्ष्य करंत होते... ऐकून न ऐकल्यासारखं.....

स्वतःच्या कामाशी कितीही प्रमाणिक राहण्याचा प्रयत्न केला तरी समोरच्याचे विचार, दृष्टीकोन कधीकधी पटायचे नाहीत.
मी पाहत होते दारू पिउन दरुबंदिवर नाटकं होतात, नाटक सुरु असताना स्टेजवर कलाकारांना हसवणं, ऍडिशन्स घेणं, सुरु नाटकात विंगेत गप्पा मारणं, मस्ती करणं, पाहत होते, पचवत होते, एकदा दोनदा या विरोधात बोलायचं धाडसही केलं पण.... उपयोग काहीच नाही... आतून उदास व्हायचे... सीरियल मधे ही मी खुप खोटी हसले....अशा वातावरणात एडजेस्ट करावं लागत होतं... त्यात काय...सगळ्यांनाच एडजेस्ट करावं लागतं .... पण  आपल्याला आयुष्यभर असचं एडजेस्ट करावं लागणार या विचारांनीच उदास असायचे.

या प्रवासात बरीच चांगली माणसेही भेटली जी आपल्या कामांशी प्रमाणिक, वेळेवर येणारी काम करून निघुन जाणारी, न कुणाच्या अद्यात न मध्यात, गोड हसणारी ही माणसे खरंच जवळ असायची तेव्हा हरुप यायचा कामाचा.... पण बाहेर पडल्यावर पुन्हा तेच प्रश्न, तुला हेच असंच काम करायचंय का? वेगळी वाट तर काही दिसत नव्हती आणि काय शोधतेय ते माझं मलाच कळंत नव्हतं....
सुपरस्टारपद जिकल्यानंतर वाटलं होतं, आता आपली गाडी सुसाट पळणार.... लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांनी, त्यांना मिळाली ती कामे स्वीकारली आणि पुढे गेले हे ऐकलं होतं, मी ही मिळेल ती कामे स्विकारत गेले... सुदैवाने मला माणसे चांगली भेटली पण काम स्विकारताना कधीच माझी भूमिका, त्याची खोली, त्याची लांबी, भूमिकेचं स्थान.... यांचा विचार न  करता किती पैसे मिळणार याचा विचार केला. आणि केवळ प्रोडक्ट बनवत राहिले.... आणि प्रोडक्ट बनवता बनवता मी ही प्रोडक्ट बनतेय याचा कधी विचारच केला नाही.

मधला काळ तर असा गेला की, माझ्याकडे काहीही काम नव्हतं. आणि घरात बसायची सवय नाही...रोज धडपड, रोज फोनफोनी, रोज ऑडिशन्स... पुस्तकात मन रमायचं नाही, की बाहेर फिरण्यात नाही, नाटक सिनेमा पहिला की अजुनच रडू यायचं... वाटायचं आपणही काम करावं.... हळूहळू ते पाहणं ही सोडून दिलं.... घरात बसून नुसती चिडचिड वाढत होती....माझा नवरा, घरातले, माझ्या वागण्याने हैराण झाले अगदी... फ्रस्ट्रेशन वाढत चाललं होतं, नकार पचवणं अवघड होऊन बसलं होतं. माझी इतकी केविलवाणी अवस्था झाली, की मी शॉपिंग करण्यामधे आनंद शोधु लागले... सगळी सेव्हिंग संपवली, पुन्हा रडगाणं सुरु....बरं नवऱ्याचे पैसे वापरायचे नाही,स्वाभिमान आड यायचा... असं हसु करून घेतलं मी स्वतःचं..... पण मनावर कंट्रोल जमत नव्हता. काम हवं होतं, पैसा हवा होता.... 

खरंतर अशी परिस्थिति बऱ्याच कलाकारांवर येते पण काम मिळवण्यासाठी मी कुठल्याही आड मार्गाला गेले नाही किंवा तसा विचारहि मनात कधी आला नाही...ही मात्र जमेची बाजू ......  नाहीतर स्वैर,मनस्वी मूली कुठल्या थराला जातात... हे काही नवीन नाही....
एके दिवशी घरातल्या झोपाळ्यावर झुलत विचारात असतानाच जणु ती आर्तता, ते vibrations अवकाशात पोहचले असावेत आणि माझ्या मोबाइलवर एक मेसेज आला..

"Envision, experience and explore yourself as a performer & creative human being in "Theatre of Relevance” Residential workshop"

सुरवातीला तर दुर्लक्ष्य केलं. पैसे कुठेयेत भरायला... आणि असं वर्कशॉप वगैरे करून कामं थोडीच मिळणार आहेत.... मनातून विचार काढून टाकला.... मग आठवलं, एका नाटकाच्या दौऱ्यात वेळ असताना "अश्विनी नांदेड़कर" हिने तिच्या एका वर्कशॉपचा एक सुखद अनुभव मला सांगितला होता. तिने काही कातकरी मुलींना एकत्र जमवुन त्यांचं वर्कशॉप घेतलं होतं. सुरवातीला नावहि सांगायला लाजणाऱ्या त्या मूली वर्कशॉप च्या शेवटच्या दिवशी कशा नाचल्या, हासल्या.... इतकंच नाही तर, गावच्या बसस्टैंड पर्यंत रैली काढून बसस्टैंड मधे पथनाट्य सादर करून आल्या आणि तेहि "जिंदाबाद जिंदाबाद कातकरी मूली जिंदाबाद" हा नारा जोरजोरात लगावत!! अश्विनी तिथून निघताना त्यातील एकिने परीचं चित्र काढून "तू आमची परीताई" असा तिचा गौरव करून तिला ग्रीटिंग गिफ्ट केलं, हां अनुभव तिने मला सांगितला होता. हाच तो वर्कशॉप असावा असं मला वाटलं.

नाटकाच्या दौऱ्यात अश्विनीने एकदा तिच्या "गर्भ" नाटकातिल एक भाग परफॉर्म करून दाखवला होता. तो परफॉरमेंस बघुन तर मी मंत्रमुग्ध झाले.... 5 मिनिटांच्या त्या सादरीकरणाने माझे डोळे पाणावले.... आणि जाणीव झाली हेच मला हवंय, हेच शोधतेय मी, असंच परफॉर्म करायचंय मला.... हेच परफेक्शन शोधतेय..... तिच्या परफॉरमेंस ने माझ्यातील अभिनेत्री जागी झाली होती.... जी सत्वाच्या शोधात होती. तो "काहीतरी" चा शोध.... म्हणजे सत्व होतं, हे तेव्हा उमगलं.... 'क्या ढूंढता है मनुष्य' हे तिच्या नाटकातिल वाक्य मला हलवुन गेलं..." मै खड़ी होना चाहती हूँ, रेंगना नही चाहती... रेंगना जीवन नही.... मैं गर्भ से बाहर आना चाहती हूँ ...." ही वाक्य मला माझी वाक्य वाटली. खुप कनेक्ट झाले होते तिच्याशी.... त्या कैरेक्टरशी....

एकाच वेळी प्रेक्षक म्हणून भारावले आणि दुसरीकडे आग उत्पन्न झाली एक परफ़ॉर्मर म्हणून असं प्रभावी परफॉर्म करायची.... मी विचारलं, "कुणी शिकवलं हे तुला... कुणी लिहिलय हे इतकं प्रभावी....?" आमचे सर आहेत, ती म्हणाली. "अगं तुझ्या डोळ्यात दिसलं... तू आक्ख्या ब्रम्हांडात फिरतेएस.... ग्रहांना हात लावतेएस....त्यांना हातात घेतेएस... really i could feel it...."
तेव्हा तिने प्रोसेस सांगितली की, सर आधी तुम्हालाच नाटक उभं करायला सांगतात आणि नंतर त्यात प्राण ओततात. तिने उदाहरण दिलं की,  ब्रम्हांडात ती फिरते आणि एका-एका ग्रहांला हात लावत ती सूर्याकडे पोहचते आणि तिचे डोळे दिपतात. तेव्हा सरांनी तीला जुहू चौपाटीवर नेउन खास तो मावळता सूर्य दाखवला आणि विचारलं, आता या सूर्याला पाहून तुझे डोळे दिपतात का गं...?

आता ती अलगद घागरा उचलते त्या समुद्राच्या लाटांवर पडलेल्या कवडस्यावरुन चालत सूर्यापर्यंत पोहचते आणि मग "एक टुकड़ा सूर्य" हां संवाद म्हणते.... ही प्रक्रियाच मला खुप भन्नाट वाटली.... वेगळं काही आज ऐकायला मिळालं.... कोण आहे हां दिग्दर्शक, जो सूर्य दाखवतो....मलाही भेटायचंय.... असं काम मी यापूर्वी कद्धिच केलं नव्हतं. मी आनंदात होते, मला वेगळं काही सापडलं होतं.... आता वेळ होती तीथपर्यंत पोहचण्याची....

मी पुन्हा फोन हातात घेतला, अश्विनीला फोन लावला आणि विचारलं, "हां तो तू सांगीतलेला तुझ्या सरांचाच वर्कशॉप आहे का?" पलिकडून आवाज आला, "हो योगिनी, तू जे सत्व शोधत होतीस नं, तुला इथे नक्की मिळेल...."
नाविन्याचा शोध आता संपला, आता वेळ होती कृतिचि......
- क्रमश:

प्रवास कला साधनेचा - प्रस्तावना.

Hii friends,
मी सध्या
"अनहद नाद- Unheard sounds of universe" या बहुभाषिक नाटकात काम करत आहे. मागच्या 1 वर्षापासून मी आणि आमची टीम या नाटकाच्या प्रोसेस मधे आहोत. हे नाटक माझ्यासाठी केवळ नाटक नसून ती एक प्रक्रिया आहे, मी मला भेटण्याची.... हा एक प्रवास द्वैताकडून अद्वैताकडे नेणारा.... साधनेपासून सिद्धिकडे नेणारा हा प्रवास एक कलाकार आणि त्याहिपलीकडे एक माणूस म्हणून खुप समृद्ध करून गेला.
या नाटकाचे मी किती shows केले यापेक्षा मी हे नाटक किती आत्मसात केले हे या "थियेटर ऑफ़ रेलेवंस" फिलॉसॉफी प्रक्रियेत मी शिकले आणि शिकतेय. या नाटकाचा उगम, बीजारोपण, अंकुर ते वृक्ष बनण्याची प्रक्रिया भन्नाट आहे. अजूनही मी या प्रकियेत, साधनेत आहे आणि कलाकार म्हणून नेहमीच असेन.
मुळात जो कलाकार आहे त्याला जगण्याचं सार आणि सत्व दाखवणारी ही प्रक्रिया.... माझ्या इतर सर्व कलाकार आणि माणूस म्हणून जगणाऱ्या मित्र मैंत्रिणींपर्यंत पोहचावि म्हणून हा अट्टहास....
आजपासून मी माझी आणि माझ्या नाटकाचि प्रक्रिया प्रोसेस तुमच्याशी शेअर करणार आहे. महिनाभराच्या या सदरात कथांमधून ही प्रक्रिया सादर होईल.
माझी खात्रिये हे फेसबुक सदर तुम्हाला नक्की आवडेल. तुमच्या प्रतिक्रिया स्वागताहर्य आहेत.
धन्यवाद.
योगिनी चौक.