मला माझं "ब्रम्हस्वरूप" शोधायचंय....
पण कसं...?
मी जसजशी "थियेटर ऑफ़ रेलेवंस" मधे परफॉर्म करत गेले तसतशी 'ब्रम्हस्वरूप शोधाच्या' आणि 'सात्विकतेच्या' जवळ जात गेले.
ढोबळ आयाम.... सारेच पाहतात.
कलात्मक सात्वीकतेसाठी वेगवेगळे पैलू शोधून काढणं महत्वाचं.
उदा.
रुपया चे दोन पैलू असतात.
मागची बाजु आणि पुढची बाजु - हा ढोबळ आयाम.
त्यासोबत रुपयाचे वर, खाली, आतला सर्कल... हे आणखिन आयाम पाहणं, हा थियेटर ऑफ रेलेवन्स चा उद्देश.
इथे अर्जित केलेलं ज्ञान आपले मित्र, परिवार, सोबती यांसोबत वाटणं, शेअर करणं, आणि रोजच्या जीवनात ते ज्ञान अंगीकारणं ही अटच आहे.
मुळात ती एक गरज आहे "कलात्मक लिबरेशनची" असं माझं ठाम मत आहे.
ध्वनी एक आहे तर त्याच्या प्रतिध्वनि किती असतील?
आकरविहीन आणि रूपविहीन प्रस्तुति असेल, तर ती कशी असेल?
"Unheard Sounds of universe" नाटकाचा विचार, शोध, सृजनात्मक प्रकिया सुरु कधी आणि कशी झाली कळलं ही नाही.
मंजुल सर, नेहमी त्यांच्या दोन छोट्या छोट्या मुलींचं, एकमेकिंशी वीना संवाद, कृतीतून बोलणं सांगायचे, तेव्हा हाच आहे unheard असं वाटायचं.
Vibrations जेव्हा जाणवतात ते असावं Unheard. निसर्गाने साथ देणं, कुत्र्याने बरोब्बर आमच्या मागे मागे येणं किंवा पक्ष्यांचा संवाद असो .... न ऐकु आलेला परन्तु अस्तित्वात असणारा तो संवाद ऐकण्याचा प्रयत्न, रातकिड्यांच्या किरकिरीत म्युझिक शोधणं असो वा काजव्यांवर कविता करणं असो,
चंद्र, चांदण्यांशी झालेला संवाद, तेव्हा आकाशात तयार झालेल्या चांदण्यांच्या विविध आकृत्या, शेतात झोपुन पाहणं, आकाशाचा, वाऱ्याच्या झुळकेचा, ताऱ्यांचा, त्या चंद्राचा Unheard ऐकणं.... ही सगळी एका नाटकाची प्रक्रिया आहे यावर तुमचा विश्वास बसेल....?
सुरवातीला माझाही विश्वासच बसेना.
आपण आपला आवाज किती वेळा ऐकतो?
आपला आपल्याशी झालेला संवाद....?
आत्मसंवाद, आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण, हाच Unheard नाटकाचा गाभा.
"मी एक उत्तम कलाकार आहे" हाच आवाज आतून ऐकणं. त्यासाठी बाहेर डोकवण्यापेक्षा आपल्या आत डोकावणं. ही प्रक्रिया.
अश्विनी नांदेड़कर हिने, वज्रेश्वरीला एक पेंटिंग पाहिलं होतं... त्याविषयी ती सांगत होती की, एक बाई एका हातात ज्योती घेऊन उभी आहे. दुसऱ्या हाता मागे ती ज्योत लपलेली आहे. ती ज्योत आपल्याला दिसत नाही मात्र त्या ज्योतिचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला आहे.
तो प्रकाश बाहेरील ज्योतिचा नसून तिच्या आंतिल ज्योतिचा आहे.
हे सांकेतिक पेंटिंग मला 'माझ्या अनहर्डच्या' अधिक जवळ घेऊन गेलं.
As a Performer, मी माझी मूळं घट्ट करणं आवश्यक होतं. त्यासाठी आधी मी कोण आहे, आधी काय कामं केली आहेत, मी किती प्रसिद्ध आहे, हे सर्व सोडून, माझ्यातील व्यक्ति वर प्रक्रिया होणं सुरु झालं. याकरिता सतत स्वताःला तोड़त होते आणि पुन्हा उभी राहत होते.
मी अभिनेत्री आहे का?
माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे का? इथपासून ते.... मी काय विचार करते? माझ्यात माणुसकी आहे का? इथपर्यंत स्वतःचा शोध घेतला,
या शोधात कित्येकदा पडले, धड़पडले, तड़फडले, स्वताःला सावरलं, नियोजन केलं. आणि शिकले,
"कोणताही एक्टर असो, तो सेलिब्रिटी लोकांसाठी असतो स्वतःसाठी नाही." ही प्रकिया एक सेलेब्रेटी ते एक सात्विक कलाकार, ते एक सात्विक व्यक्ति अशी होत गेली.
सरांसोबत खुप चर्चा झाल्या, वाद विवाद झाले, प्रशोत्तरे झाली....
सर नेहमी म्हणायचे, "बहुत मुश्किल होता है अपने अंदर होने वाले अनजाने प्रभाव को हटाना।" आधीच्या धुक्यातून बाहेर येऊन स्वच्छ नितळ आभाळ आम्ही मंजुल भारद्वाज सरांसोबत पाहिलं.
माझे कंडिशन्ड विचार हळूहळू मेणाप्रमाणे वितळत गेले आणि त्यांची जागा कायमस्वरूपी ठोस विचारांनी घेतली. माझा पाया पक्का होत होता.
आत्मपरिक्षणात आम्ही आमचे "यशस्वी असण्याचे अर्थ","यशस्वी असण्याचे मापदंड" शोधून काढले, असफल असण्याचे मायने समजून घेतले. आणि जे प्रत्येक कलाकाराने शोधणं आवश्यक आहे.
या आत्मसंवाद प्रक्रियेत कलाकाराने "स्वतःशी सतत सातत्य ठेवणं" अतिशय आवश्यक आहे.
कलाकार जेव्हा स्वतःच्या अधिक जवळ जातो, आपला आवाज ऐकतो, म्हणजेच आपले Impulse फॉलो करतो तेव्हा तो आपल्या आंतिल आणि बाहेरील निसर्गाच्या अधिक जवळ जातो आणि तेव्हाच तो खरा भासतो. प्यूअर असतो. सात्विक असतो.
या चमचमत्या दुनियेत अनेक कलाकार खोटा मुखवटा घेऊन वावरताना दिसतात. "थिएटर ऑफ़ रेलेवन्स" च्या प्रक्रियेत तुमच्या मुखवटयाला बाहेर काढून आंतिल चेहरा समोर येतो जो सहाजिकच प्यूअर, नैचरल असतो.
तो कलाकार एक माणुस म्हणून स्वताःला भेटतो...
आणि म्हणूनच.....
Unheard sounds of universe हे नाटक कलाकाराला उन्मुक्त करतं.
तो कोण आहे?
कलाकार म्हणून जगण्याचा काय उद्देश आहे?
आणि त्याची ताकद काय आहे याची जाणीव करून देतं.
आणि जेव्हा ही जाणीव होते तेव्हा तो त्याचे स्थान मजबूत करून सुंदर विश्वनिर्मिती करण्यासाठी प्रेरीत आणि प्रतिबद्ध होतो.
क्रमशः
No comments:
Post a Comment